माझ्या साहित्यसेवेची सुरूवात झाली ती माझ्या मायबोली मराठीतून!!
जग जरी इंग्रजी भाषेच्या आहारी गेले असले तरी मराठी मधील साहित्यरचना या तेवढ्याच अनमोल आहेत.
आजकाल मी पाहतो की स्वतःला मराठी म्हणवून घ्यायला आजच्या तरुण पिढीला लाज वाटते.
मराठीत बोलतो तो मागास, गावंढळ आणि फालतू मानला जातो.
मराठी लेख, पुस्तके, साहित्य, कविता, कादंबर्या वाचणार्यांना लोक हसतात.
तेही अशा अर्थाने हसतात की काय हा माणूस काहीपण वाचत असतो. पण अशा लोकांना माझी एकच विनंती आहे की
जर तुम्हाला माहीत नसेल की मराठी साहित्या किती महत्वपूर्ण आहे तर ठीक आहे तुम्ही नका वाचू,
पण जे थोडेफार लोक मराठी भाषा नामशेष होण्यापासून वाचवण्याचा मनापासून प्रयत्न करत आहेत त्यांना तरी discourage करू नका.
आता इथे मी कुणी प्रतिथयश लेखक नाही की मोठ्ठा कवी नाही, कविता करणे हा माझा लहानपणापासूनच जपलेला छंद आहे.
आणि गेल्या काही वर्षात या इंग्रजीच्या मोहजळात मी जवळपास मराठीला विसरलोच होतो.
ज्ञानेश्वर माउलिंच्या नित्य नूतन अशा ज्ञानेश्वरी ची सुरूवात ज्या नमनाने होते, त्या ओळी मी इथे मांडतो आहे:
ॐ नमो जी आद्या| वेद प्रतिपाद्या| जय जय स्वसंवेद्या| आत्मरूपा || १||
देवा तूंचि गणेशु| सकलार्थमतिप्रकाशु| म्हणे निवृत्तिदासु| अवधारिजो जी || २||
हें शब्दब्रह्म अशेष| तेचि मूर्ति सुवेष| जेथ वर्णवपु निर्दोष| मिरवत असे || ३||
इथून पुढे मी माझ्या कविता, लेख इत्यादी या पानावर प्रसिद्ध करणार आहे. तेव्हा पुन्हा भेट द्यायला विसरू नका.
Like this:
Be the first to like this page.