मी लिहिलेली आणि माझी सर्वात आवडती चारोळी
तुझा नाद सोडायचा विचार आला
तुझ्यासाठी जगता जगता
कारण मीही खड्ड्यात पडलो
तुझ्याकडे बघता बघता
शंका
बघू नकोस अशी
भुवई वर करुन एक
शंका येतेय़ मला
तुझा इरादा नाही नेक
प्रेम
मान्य आहे तुमचं म्हणणं
प्रेम करणे नाही गुन्हा
पण एकदा केलं बस झालं
आता करू नका पुन्हा
चिखल
चिखलात घसरून पडल्यावर
कसे पडलो कळत नाही
प्रेमात ही असेच असते
फक्त लवकर उठता येत नाही
वाट
वाटे कडे डोळे लावून
तुझी वाट मी बघत आहे
जगून ही मरतो आहे
आणि मरुन ही जगतो आहे
एकटक
तुझ्याकडे पाहून मला कळलं
मुक्त हसू कसं असतं
माझ्याकडे बघ मग तुला कळेल
एकटक बघणं कसं असतं
simply superb……. hats off dear
Mast re bhai… sundar ahet.
college chi gf athavli na …
Ek number ahe he…
Jinklasss